जग विषयी जनरल नॉलेज। जगातील खंडाची माहिती। स्टेप बाय स्टेप GK_1433।
जगाची व्याख्या:
व्याख्या_ पृथ्वीवरील मानवी वस्ती, त्यांची स्थिती यासाठी जग हा शब्द वापरला जातो.
जगात साधारण ६.६ अब्ज लोक राहतात.
जगात एकूण सात खंड आहेत.
जगात चार महासागर आहेत.
पृथ्वी
हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे.
सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे.
पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात.
जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे .
पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.
खंड
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे २९% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे.जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागाला खंड असे म्हणतात. किंवा समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे.
सात खंड
आशिया - आफ्रिका - ऑस्ट्रेलिया - अंटार्क्टिका - युरोप - उत्तर अमेरिका - दक्षिण अमेरिका
आशिया - आफ्रिका - ओशनिया - अंटार्क्टिका - युरोप - उत्तर अमेरिका - दक्षिण अमेरिका
सहा खंड
आफ्रिका - अंटार्क्टिका - ओशनिया - युरेशिया - उत्तर अमेरिका - दक्षिण अमेरिका
आफ्रिका - अमेरिका - अंटार्क्टिका - आशिया - ओशनिया - युरोप
पाच खंड
आफ्रिका - अमेरिका - ओशनिया - अंटार्क्टिका - युरेशिया
आफ्रिका - अमेरिका - ओशनिया - युरोप - एशिया
चार खंड
अमेरिका - ओशनिया - अंटार्क्टिका - युराफ्रिशिया
आशिया
सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आक्टिर्टक महासागर ,पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत . आशिया खंड , युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे . युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत.यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्रवीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहेत.
आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वांत मोठा व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील ६०% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८.६% भाग आशियाने व्यापला आहे.
दक्षिणी महासागर किंवा दक्षिण ध्रुवीय महासागर किंवा ॲंटार्क्टिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वांत दक्षिणेकडील महासागर आहे. दक्षिणी महासागराने अंटार्क्टिका खंडाला चारही बाजूंनी पुर्णपणे वेढले आहे. दक्षिणी महासागर अंटार्क्टिक ह्या भौगोलिक प्रदेशात गणला जातो.
प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.
भारतीय महासागर किंवा हिंदी महासागर हा पृथ्वीवरील एक महासागर आहे. हिंदी महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हिंद महासागर हा जगातील तिसरा मोठा समुद्र आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे 20% पाणी आहे. उत्तरेकडील भारतीय उपखंडातून, पश्चिमेस पूर्व आफ्रिका; पूर्वेस, भारत सुंदा बेटांनी आणि ऑस्ट्रेलियाने वेढलेला आहे आणि दक्षिणेस दक्षिण ध्रुव महासागर आहे. हे जगातील एकमेव महासागर आहे ज्याचे नाव एका देशाच्या नावावर आहे, म्हणजेच हिंदुस्तान (भारत). संस्कृतमध्ये त्याला रत्नाकर असे म्हणतात, म्हणजेच तो रत्न आहे, तर प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये त्याला हिंद महासागर असे म्हणतात.
युरोप खंड
युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत.
उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.
आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.
युरेशिया हा पृथ्वीवरील एक मोठा प्रदेश आहे. काही संकेतांनुसार युरेशिया हा एक खंड मानला जातो. युरेशियामध्ये युरोप व आशिया ह्या दोन खंडांचा समावेश होतो.
सिनाई द्वीपकल्प हा इजिप्त देशातील एक त्रिकोणी आकाराचा द्वीपकल्प आहे. सिनाईच्या उत्तरेला भूमध्य समुद्र तर दक्षिणेला लाल समुद्र आहेत. सिनाईच्या पूर्वेस अकबाचे तर पश्चिमेस सुएझचे ही दोन अरूंद आखाते आहेत. सर्वासाधारणपणे आफ्रिकेत गणल्या जाणाऱ्या इजिप्तचा सिनाई हा एकमेव भाग पश्चिम आशियामध्ये आहे. सिनाई द्वीपकल्पाची लोकसंख्या सुमारे १३ लाख इतकी आहे.
जगाचा पर्यायी नकाशा आशिया विस्तार व सीमा: या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार १0 दक्षिण ते ८१ उत्तर इतका आहे व रेखावृतीय विस्तार २६ पूर्व ते १७० पश्चिम याच्या दरम्यान आहे.
उर्वरित भाग पुढील post मध्ये येईल धन्यवाद।।।
उर्वरित भाग पुढील post मध्ये येईल धन्यवाद।।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा